मिरज शासकीय रुग्णालयाची स्वागतम कमान बांधकामादरम्यान कोसळली; चार कामगार गंभीर जखमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक
प्रतिनिधी प्रशांत शिंदे मिरज येथील शासकीय रुग्णालय येथील स्वागत कमान बांधकामादरम्यान कोसळून चार कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने उपस्थित केले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी. सार्वजनिक निधीचा गैरवापर किंवा बांधकामात अनियमितता आढळल्यास संबंधित ठेकेदारावर चौकशी अंती कठोर कारवाई करावी व स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित ठेकेदाराचे काळे यादीत नाव समाविष्ट करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे,युवक जिल्हाकार्याध्यक्ष स्वप्निल खांडेकर,मिरज तालुका कार्याध्यक्ष प्रशांत शिंदे, तालुका संपर्कप्रमुख देवदास कांबळे,मिरज तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष र...